Tuljabhavani Temple l तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज 1 हजार पेड, 3 हजार मोफत दर्शन पास

राज्यातील धार्मिक स्थळे सोमवारपासून खुली करण्यात येणार

online-booking-and-offline-pass-tujlabhavani-mandir-in-tuljapur
online-booking-and-offline-pass-tujlabhavani-mandir-in-tuljapur

तुळजापूर l राज्यातील धार्मिक स्थळे भक्तांना दर्शनासाठी सोमवारपासून खुली करण्यात येणार आहे. तुळजाभवानी देवीच्या Tuljabhavani Temple  दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहे.

ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत. तुळजाभवानी मंदिर Tuljabhavani Temple परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी माहिती दिली.

तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता व सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार असून दर 2 तासाला 500 भक्तांना मुखदर्शन दिले जाणार आहे.

हेही वाचा l रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही

65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंगसाठी वर्तुळाकार पट्टे ओढले जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे.

पुजारी, महंत व मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोव्हिड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, सिहासन पुजेसह इतर पूजा करता येणार नाहीत. मात्र मुखदर्शन घेता येणार आहे.

हेही वाचा l Bigg Boss 14 l ‘जान सानू’ने मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

सामुहिक आरती देखील करता येणार नसून तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश मिळणार नाही. मंदिर सुरु झाल्याने भाविकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.