Gujarat packaging factory Fire l सुरतमध्ये पॅकेजिंग कंपनीला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, १२५ जणांची सुखरुप सुटका

2-killed-125-rescued-after-massive-fire-breaks-out-at-packaging-factory-in-surat-news-update
2-killed-125-rescued-after-massive-fire-breaks-out-at-packaging-factory-in-surat-news-update

सुरत: गुजरातमधील सुरत येथे आज, सोमवारी पहाटे विवा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागली. या भीषण आगीमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून १२५ लोकांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. 

माहितीनुसार, सुरतच्या कडोदरा येथील विवा पॅकेजिंग कंपनीला आज पहाटे भीषण आग लागली. यावेळी सर्व कामगार पाचव्या मजल्यावर काम करत आहे. काही कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पाचव्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. तसेच हायड्रोलिक लिफ्टद्वारे जवळपास १२५ कामगाराचा जीव वाचवण्यात यश आले.

खरंतर ही आग कंपनीच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. परंतु लगेच ती आग इतर मजल्यावर पसरली. त्यामुळे इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी क्रेनचा वापर केला गेला. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, अग्निशमन दलाच्या पथकाला खिडक्या तोडून आत घुसावे लागले. ही भीषण आग लागल्या मागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनीच्या माहितीनुसार, ‘जेव्हा आग लागली, तेव्हा अनेक कामगार पाचव्या मजल्यावर काम करत होते. आगीचे लोट पाहताच कामगार खूप घाबरुन गेले आणि आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पाचव्या मजल्यावरून उडली मारली.’ सूरतच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कामगारांचा बचाव करण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आग लागण्यामागच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.’

हेही वाचा 

भाजपा नेत्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Kisan Rail Roko Andolan: किसानों का रेल रोको आंदोलन आज, सुबह 10 बजे से शाम 4 बजे तक पटरियों पर थमेगी रफ्तार 

खुशखबर: बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here