VIDEO : कैद्याने तुरुंगाच्या ४० फूट उंच संरक्षण भिंतीवरून मारली उडी!

23-years-old-rape-accused-escapes-from-davangere-jail-jump-40-feet-prison-wall-cctv-video-viral-news-update
23-years-old-rape-accused-escapes-from-davangere-jail-jump-40-feet-prison-wall-cctv-video-viral-news-update

कर्नाटकातील दावणगेरे येथील उप कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय कैद्याने शनिवारी दावणगेरे उप कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कैद्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, वसंत कुमार असं २३ वर्षीय कैद्याचं नाव आहे. एका बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून तो दावणगेरे येथील उप कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, कैदी वसंत कुमार याने शनिवारी ४० फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

 कैदी वसंत कुमार याने संरक्षण भिंतीवरून उडी मारल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर काही सेकंदात त्याने स्वत:ला सावरलं आणि लंगडत-लंगडत गेटच्या बाहेर गेला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षाच्या मदतीने तो तातडीने घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी कर्नाटकातील करूर भागातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी दावणगेरे महिला पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, शनिवारी कारागृहाच्या ४० फूट उंच संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपीनं पलायन केलं आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here