औरंगाबाद: वाहन चालवतांना वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजे. नियम पाळले नाही तर दंड होतो हे माहित असून सुध्दा गेल्या अकरा महिन्यांत ५ लाख ५ हजार ३० वाहनधारकांनी नियम मोडले. नियम मोडणा-या महाभागांकडून ३३ कोटी १ लाख ८० हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आले. ही आकडेवारी औरंगाबाद पोलिसांच्या वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे.
वाहन परवाना नसणे, राँग पार्किंग करणे, अस्पष्ट फॅन्सी नंबर प्लेट लावणे, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, विना पासिंग वाहन चालविणे यासह इतर वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. १ जानेवारी २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ५ लाख ५ हजार ३० वाहनधारकांकडून ३३ कोटी १ लाख ८० हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आले.
गुन्ह्यांची माहिती दाखल दंड
विना लायसन्स वाहन चालविणे ३३८६ ७०००००
विना सिटबेल्ट वाहन चालविणे २३७०० ९०८४००
दारु पिऊन वाहन चालविणे ७९ ३३०४००
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे १०९९९ ५१५०००
वेग मर्यादेचे उल्लंघन ७८१३ २५५१०००
थांबण्याचा इशारा न मानने १५९८२ १०६२७५०
परवान्याचे उल्लंघन ७५ ८००००
बंद मार्गाने प्रवेश ५६८१६ २३७४५००
काळी काच २८०७ २५५०००
राँग पार्किंग करणे ५९५०६ ५३३२५००
विना हेल्मेट चालविणे ३५८६५ ६५३५००
ट्रिपल सिट ४४४२३ १५०१०००
धोकादायक रित्या वाहन चालविणे ३० ०
वाहनात बदल करणे ३०६१ २७७०००
विना गणवेश टॅक्सी चालविणे १०३८० ६२४५००
स्टँण्ड सोडून पार्किंग ९६०२ ७५३०००
जास्त प्रवासी बसवणे ६६५२ २२२६००
महाराष्ट्र पोलिस कायदा १३० २०७००
विना पासिंग वाहन चालविणे १९ ३२०००
मोटार वाहन कायदा इतर १६८३४३ १३२३४४००
नियमांचे पालन करायला पाहिजे…
आमची दररोजच कारवाई सुरु राहते. वाहनधारकांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे. मात्र वाहनधारक नियमांचे पालन करत नाही. अकरा महिन्यांत आम्ही नियम तोडणा-या वाहनधारकांवर कारवाई केली आहे. कारवाई सतत सुरु राहिल.
अशोक थोरात, सहाय्यक आयुक्त वाहतूक विभाग, औरंगाबाद