नवी दिल्ली : औरंगाबाद कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणूका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत.(Cantonment boards elections cancelled) संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून १७ मार्च पासून निवडणूकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत औरंगाबाद कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.
देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात एकूण ६२ कॅन्टोन्मेंट आहेत. त्यातील ५७ च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आदेश जरी करून पुढील आदेश येतीपर्यंत या निवडणुका स्थगिती दिली आहे.
गेल्या अडीच तीन वर्षापासून छावणी परिषदेच्या निवडणूका झाल्या नाही. सध्या स्वीकृत सदस्य हे काम पाहात आहेत. काही दिवसांपूर्वीच रक्षा मंत्रालयाने छावणी परिषदेच्या निवडणुकांची तारीख घोषित केली होती. काही दिवसांपूर्वी छावणी परिषदा महानगरपालिकेमध्ये विलीन होणार याचीही चाचपणी सुरु होती. मात्र, छावणी परिषदेच्या निवडणूका घोषित झाल्या. इच्छूक तयारी लागले. बैठकांचा जोर वाढला. परंतु आज शुक्रवारी 17 मार्च 2023 रोजी अचानक रक्षा मंत्रालयाच्या पत्रामुळे इच्छूकांना चांगलाच धक्का बसला.
महायुती,भाजप-शिंदे गटात नाराजी…
महायुती, भाजप-शिंदे गटाने छावणी परिषदेसाठी कंबर कसली होती. निरीक्षकांची नेमणूक केली होती. निवडणुका जिंकणार यासाठी नियोजनही आखले होते परंतु आजच्या निर्णयामुळे त्यांनाही चांगलाच धक्का बसला.
–