सोलापूर l युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार global-teacher-award आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले ranjit-singh-disley यांना जाहीर झाला आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.
Hats off to @ranjitdisale, winner of the #GTP2020 and to @DrFrostMaths, winner of the #GlobalTeacherPrize Covid Hero Award!👏👏@UNESCO & @VarkeyFdn stand together to support all the teachers in the world. Thank you for your inspiration & dedication!🙏🙌pic.twitter.com/lQkqIsB6gy
— UNESCO (@UNESCO) December 3, 2020
जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांमधून मारली बाजी
जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा l vodafone-idea युजर्सना झटका, युजर्सना मोजावे लागणार जास्त पैसे
QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हेत तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा l Xiaomi शाओमीचा स्मार्टफोन झाला स्वस्त,पाहा किमत फीचर्स