महिलेने कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला अन् मृत्यूने गाठलं!

83-year-old-woman-died-after-taking-corona-vaccine-second-dose-while-returning-home-in-madhya-pradesh-news-update
83-year-old-woman-died-after-taking-corona-vaccine-second-dose-while-returning-home-in-madhya-pradesh-news-update

भोपाळ l कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोक कोरोना लस Corona vaccine घेत आहेत. एका 83 वर्षीय महिलेनेही कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी कोरोना लस घेतली. लशीचे दोन्ही डोस तिने घेतले. पण तिला मृत्यूने गाठलं Woman died after taking corona vaccine. कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

कोरोना लशीचा दुसरा डोस घेऊन घरी परतणाऱ्या या महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं आहे. मध्य प्रदेशच्या गुनामध्ये घडलेली ही घटना आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शांतीबाई असं या महिलेचं नाव आहे. एका अंगणवाडी कर्मचाऱ्याने तिला लसीकरण केंद्रावर आणलं होतं. सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी तिने कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. नर्सने तिला कोरोना लस दिली. लस घेतल्यानंतर तिने काही वेळ लसीकरण सेंटरवर आरामही केला आणि त्यानंतर ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली.

पण कोरोना लस घेतल्यानंतर शांतीबाई आपल्या घरी पोहोचल्याच नाही. शांतीबाई यांचा मुलगा घनश्यामने सांगितलं, त्या रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यानंतर त्याने आपल्या आईला सुरुवातीला लसीकरण केंद्रावर आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात नेताच तिला मृत घोषित करण्यात आलं.

घनश्यामने यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्याला जबाबदार धरलं आहे. कार्यकर्त्याने आपल्या आईला रस्त्यातच सोडलं, असा आरोप त्याने केला आहे. तर अंगवणाडी कार्यकर्त्याने आपल्यावरी आरोप फेटाळत, महिला स्वतःच आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्याचं सांगितलं.

याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पी. बुनकर यांनी सांगितलं की, महिलेचं पोस्टमॉर्टेम तीन डॉक्टरांच्या एका पॅनेलद्वारे करण्यात आलं. सुरुवातीच्या अहवालानुसार या महिलेचा मृत्यू कोरोना लशीमुळे झाला का हे विसेरा रिपोर्टनंतरच समजेल.

हेही वाचा

भाजपा आमदारांनी शिव्या दिल्या… ; भास्कर जाधवांनी सांगितलं काय घडलं

सभागृहात शिवीगाळ तोडफोड करणाऱ्या भाजपाच्या ‘या’ १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत गोंधळ; विरोधकांचा राडा,धक्काबुक्की!

Pratap Sarnaik l ‘त्या’ पत्रानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर,म्हणाले…

 …तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही;शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Maharashtra Assembly Monsoon Session 2021 l अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवर गाजणार!

महाराष्ट्र विधानसभा में हंगामा:गाली-गलौज, मारपीट, धक्का-मुक्की करने वाले 12 भाजपा विधायक एक साल के लिए सस्पेंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here