Delhi Cantt Rape Murder Case l “राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेन”

दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या 9 Year Old Raped In Delhi करण्यात आली. या घटनेनंतर दरम्यान, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीतील छावणी परिसरात असलेल्या गावात जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबियांना मदतीची ग्वाही दिली.

Delhi-cantt-rape-murder-case-9-yr-old-raped-in-delhi-forcibly-cremated-Congress-Leader-rahul-gandhi-meets-the-family-of-the-minor-girl
Delhi-cantt-rape-murder-case-9-yr-old-raped-in-delhi-forcibly-cremated-Congress-Leader-rahul-gandhi-meets-the-family-of-the-minor-girl

नवी दिल्ली l दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या 9 Year Old Raped In Delhi करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीत संताप व्यक्त होत असून, सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकारण तापू लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीतील छावणी परिसरात असलेल्या गावात जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबियांना मदतीची ग्वाही दिली.

दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी हा आरोप केला असून, या प्रकरणाने उन्नावमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेन”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं.

राहुल गांधींच्या भेटीआधीच या मुद्द्यावरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. या घटनेवरून विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं जात असून, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही अमित शाह यांनी संसदेत येऊन निवेदन करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

संजय राऊतांनी राज्यपालांना दिला ‘हा’ इशारा,म्हणाले…

Maharashtra TET -2019 l टीईटी पात्र उमेदवार एका वर्षापासून गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत,शिक्षण विभागाचे दुर्लक्ष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here