
आजच्या डिजिटल युगात YouTube हे केवळ मनोरंजनाचे साधन बनले नाही तर आज लाखो लोकांसाठी करिअर आणि पैसे कमावण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे. कारण या युटयूबवर आज जगभरातील अनेक लोकं त्यांचे रोजचे दिनचर्येचे व्हिडिओ तसेच अनेक ठिकाणांचे व्लॉग कंटेंट क्रिएटर्स टाकत असतात. त्यातून निर्माते केवळ व्हिडिओंद्वारे त्यांची ओळख स्थापित करत नाहीत तर भरीव उत्पन्न देखील मिळवतात. वापरकर्त्यांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली वस्तू म्हणजे YouTube Play Buttons, ज्यामध्ये Golden Button ही एक अनोखी क्रेझ आहे. पण हे Golden Button कोणाला मिळते? आणि त्यामुळे कमाई वाढते का? चला तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या लेखातुन जाणून घेऊयात.
गोल्डन बटण कोणाला दिले जाते?
YouTube त्यांच्या चॅनेलच्या वाढीची आणि कठोर परिश्रमाची दखल घेण्यासाठी विविध टप्प्यांवर त्यांच्या निर्मात्यांना पुरस्कार देते. यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे गोल्डन प्ले बटण, जे निर्मात्यांना त्यांच्या चॅनेलचे सदस्य संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचल्यावर दिले जाते. हा पुरस्कार निर्मात्याची लोकप्रियता आणि त्यांच्या समुदायाची ताकद प्रतिबिंबित करतो. सिल्व्हर बटण 1 लाख सदस्यांवर दिले जाते, तर गोल्डन बटण त्या टप्प्याच्या दहापट वेळा दिले जाते. ते प्राप्त करणे ही कोणत्याही YouTuber साठी एक मोठी कामगिरी मानली जाते.




















































































































































































