एमआयएम नगरसेवक मेहराज खानला तिसरे अपत्यप्रकरणी अटक

बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरण: मुख्याध्यापकही गजाआड, ११आरोपींचा समावेश

https://freepressindia.in/mim-corporator-mehraj-khan-arrested-in-third-child-case/
https://freepressindia.in/mim-corporator-mehraj-khan-arrested-in-third-child-case/

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढवण्यासाठी एमआयएमचा नगरसेवक मेहराज खान (Meraj khan) याने तिसरे अपत्य लपवल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला. मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्’ाच्या तपासात हे प्रकरण समोर आले. त्यावरून सिटी चौक पोलिसांनी १२ मे रोजी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नगरसेवकासह त्याला मदत करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी एमआयएममध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

नगरसेवक मेहराज खान जलील खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी या दोघांसह निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान, सज्जू उस्ताद आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनिषा हिवराळे यांनी फर्यिाद दाखल केली आहे. २७ मार्च रोजी इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांनी सिटी चौक ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात मेहराजचा भाऊ मिनाज खानसह ११ आरोपींचा समावेश होता. यात एक विधिसंघर्षग्रस्त बालकही होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक नर्मिला परदेशी यांनी दिली.

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्’ाच्या तपास अधिकारी मनिषा हिवराळे यांनी दोघांना अटक करून विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. त्याची माहिती नातेवाईकांना देऊन त्याचे आधारकार्ड मागवले. तेव्हा त्याने वडिलांचे नाव मिनाज खान तर आईचे नाव इकरा खान सांगितले होते. गुन्हा गंभीर असल्याने त्याला बालगृहात दाखल केले होते. त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाचे बोनाफाईड सर्टिफिकेट मिळावे म्हणून पोलिसांनी तो शिकत असलेल्या शाळेत पत्रव्यवहार केला. मुख्याध्यापक इलियास सिद्दीकी यांनी तो आठवीत शिकत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

दरम्यान, नगरसेवक मेहराज खान यांनी मनपा निवडणुकीत अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दोन अपत्य असल्याचे नमूद केले होते. तिसऱ्या अपत्याचे नाव नमूद केले नव्हते. मुख्याध्यापक इलियास सद्दिीकीच्या लेखी जबाबात त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या वडिलांचे नाव बदलून (मेहराज ऐवजी मिनाज) आरोपी सज्जू उस्ताद याने त्याचे जन्मप्रमाणपत्र पाठवल्याचे समोर आले. त्या प्रमाणपत्राची खात्री केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. त्यामुळे मेहराजचा बोगस पणा समोर आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here