वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट, लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवा: मिनाक्षी नटराजन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन मध्ये “लोकशाही वाचवा निर्धार सभा” संपन्न..

After the theft of votes, seats, and parties, the country now faces a major crisis regarding the theft of citizenship; raise your voice to save democracy: Meenakshi Natarajan
After the theft of votes, seats, and parties, the country now faces a major crisis regarding the theft of citizenship; raise your voice to save democracy: Meenakshi Natarajan

मुंबई: देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होतीत्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागलीमग पक्ष चोरी केले जाऊ लागलेआस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहेहा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क व अधिकार नाकारले जात आहेतम्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद कराअसे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मिनाक्षी नटराजन Minakshi Natrajan यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती. या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजनराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटीलअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तेलंगाणाचे सहप्रभारी सचिन सावंतराष्ट्रीय प्रवक्तेमाजी आमदार चरणजित सप्राज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजनतिस्ता सेटलवाडचित्रा राणेजयंत दिवाण आदी उपस्थित होते..

यावेळी मार्गदर्शन करताना मिनाक्षी नटराजन म्हणाल्या कीमाझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केला हा महत्वाचा प्रश्न नाही तर माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले होते. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी तिसरा उमेदवार उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. आमच्या तक्रारीची दखलही न घेता निर्णय देण्यात आला. माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन मला पुरेसा वेळ व संधी दिली नाही पण झारखंडमधील एका उमेदवाराला मात्र त्याच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिलाआमचे ऐकूणही घेतले नाही. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व लोकांनी आवाज उठवला. माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनसभा अधिक महत्वाची आहेअसेही नटराजन म्हणाल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले कीमिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करून नटराजन यांच्यावर अन्याय केला असे नाही तर लोकशाहीवरच अन्याय केला आहे. देशात आज करो या मरोची परिस्थिती असून आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची गरज आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी हे दोनच विचार आहेत आणि लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहेअसेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

विधान परिषदेतील काँग्रेसच गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले कीमागील १२ वर्षापासून देशातील परिस्थिती बदलेली आहेलोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली आहे. सरकार विरोधकांचा आवाज दडपून टाकत आहेहे लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून लोकशाही वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहेया लढाईत १५ ते २५ या वयोगटातील तरुण वर्गाला सहभागी करून घेतले पाहिजेया तरुणाईची लोकसंख्या तब्बल ५४ टक्के आहे म्हणून या लढाईत या वर्गाचा सहभाग असणे महत्वाचे आहे. आज इतिहासाची मोडतोड केली जात आहेहा चुकीचा इतिहास पसरवणे रोखले पाहिजे. सोशल मीडिया ही मोठी ताकद असून तीचा जास्तीत जास्त वापर कराअसे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.

तुषार गांधी यावेळी म्हणाले कीदेशातील आजची परिस्थिती ब्रिटीश राजवटीपेक्षा वाईट आहे. सध्या वैचारिक गुलाम बनवले जात आहेया सरकार विरोधात रस्त्यावरची मोठी लढाई लढावी लागणार आहे. सरकारविरोधात मोठा लढा निर्माण केला तरच सत्तेला हादरे बसतील पण मोठा विरोधी आवाजच होत नाही म्हणून सरकार त्याचा फायदा उठवत आहे. संविधानाला विरोध हा काही आता केला जात नाही तर संविधान निर्माण होत असल्यापासूनच त्याला विरोध केला जात होता. सत्ताधारी भाजपा संविधानाला सशक्त करणाऱ्या संस्थांवरच घाला घालत आहेया संस्था टिकल्या तरच संविधान टिकेल. सरकारच्या नाकात दम आणला पाहिजे अशा आंदोलनाची आज गरज आहे आणि तसे आंदोलन झाले पाहिजेअसे तुषार गांधी म्हणाले. यावेळी उल्का महाजनतिस्ता सेटलवाड यांनीही मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here