औरंगाबादमधील कर्करोग रूग्णालयास स्व.विलासराव देशमुख यांचे नाव देणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी दिली.

A cancer hospital in Aurangabad will be named after Vilasrao Deshmukh
A cancer hospital in Aurangabad will be named after Vilasrao Deshmukh

औरंगाबाद : लातूर – औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयास (Government cancer hospital in Aurangabad)  स्व.विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे नाव देण्यात येणार असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी दिली.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ.प्रदीप जैस्वाल, सदस्य आ.सतीश चव्हाण, इक्बालसिंग गिल, मकरंद कुलकर्णी, मेहराज पटेल, भाऊसाहेब जगताप, नारायण कानकाटे, अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे-कागीनाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.काशीनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती.

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांनी औरंगाबाद येथे शासकीय कर्करोग रूग्णालय सुरू झाले. त्यामुळे या रूग्णालयास स्व.विलासराव देशमथळ यांचे नाव द्यावे असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला.

समितीच्या सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर केला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आदी ठिकाणाहून कर्करोगाचे रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. सदरील रूग्णालय कर्करोगाच्या रूग्णांसाठी आता आशेचा किरण ठरत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here