Vijay Vallabh Hospital Vasi Virar Fire l वसई विरारच्या कोरोना सेंटरमध्ये एसीचा स्फोट, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

Vijay-Vallabh Hospital-Virar-Fire-mumbai-maharashtra -13-people-have-died-fire-broke-out-vijay-vallabh-covid-care-
Vijay-Vallabh Hospital-Virar-Fire-mumbai-maharashtra -13-people-have-died-fire-broke-out-vijay-vallabh-covid-care-

मुंबई : नाशिक येथील ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा बळी गेला. या घटनेला 48 तास उलटण्याआधीच विरार येथे मध्यरात्री विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.Vijay-Vallabh Hospital-Virar-Fire-mumbai-maharashtra -13-people-have-died-fire-broke-out-vijay-vallabh-covid-care

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास  ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: Vijay Vallabh Hospital Vasi Virar Fire : मुंबई कोविड सेंटर में लगी आग: ICU में भर्ती 13 मरीजों की मौत

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

मृतांची नावं
उमा सुरेश कनगुटकर
निलेश भोईर
पुखराज वल्लभदास वैष्णव
रजनी आर कडू
नरेंद्र शंकर शिंदे
जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
कुमार किशोर दोशी
रमेश टी उपयान
प्रविण शिवलाल गोडा
अमेय राजेश राऊत
रामा अण्णा म्हात्रे
सुवर्णा एस पितळे
सुप्रिया देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here