रुग्णवाहिकेला भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना, पुण्यावरुन हैदराबादकडे जाताना घडला अपघात

accident-to-ambulance-on-solapur-pune-national-highwaythree-people-were-killed-on-the-spot
accident-to-ambulance-on-solapur-pune-national-highwaythree-people-were-killed-on-the-spot

पुणे l एका रुग्णवाहिका मृतदेहाला घेऊन  निघाली होती. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार,  तर दहाजण जखमी झाले आहेत.  ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ घडली.accident-to-ambulance-on-solapur-pune-national-highway-three-people-were-killed

पुण्यात रोजगारासाठी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह हैदराबाद येथे मूळगावी नेताना शववाहिकेला अपघात होऊन त्यात एका महिलेसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक मोहोळ येथे शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये ३५ वर्षाच्या शववाहिका चालकाचाही समावेश असून त्याचे नाव समजू शकले नाही. रवी माणिक राठोड (वय ३८) व बुध्दीबाई चन्नापागूल (वय ४५) अशी अन्य दोघा मृतांची नावे आहेत. सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर मोहोळ येथे शववाहिका समोरील एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार आदळली आणि हा अपघात घडला.

मूळचे हैदराबादजवळ राहणारे राठोड कुटुंबीय रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी पुण्यात वारजे माळेवाडी येथे राहतात. त्यांच्या घरातील एका पुरूषाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी मूळगावी उरकण्यासाठी मृतदेह शववाहिकेतून हैदराबादकडे नेण्यात येत होते.

हेही वाचा l Local train l आता शिक्षकांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार

शववाहिकेत, मृतदेहाजवळ शोकाकूल राठोड कुटुंबीयांसह निकटचे काहीजण बसले होते. मध्यरात्री शववाहिका मृतदेह घेऊन पुण्याहून निघाली होती. पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर समोरील एका वाहनाला शववाहिका अचानकपणे आदळली.

शववाहिकाचालकाला पहाटे डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा l दिवाळी गोड l वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, वीज कर्मचा-यांचा संप मागे

मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सर्व दहा जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुऴे एकच खळबळ उडाली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here