औरंगाबाद : महिलेच्या विनयभंग प्रकरणी औरंगाबादचा पोलीस अधिकारी एसीपी विशाल ढुमे (Acp Vishal Dhume) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृह विभागानं ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मद्यधुंद अवस्थेत मित्राच्या पत्नीसोबत गैरकृत्य करत विनयभंग केल्यानं एसीपी विशाल ढुमेवर निलंबनाीच कारवाई करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात ढुमे आपला मित्र आणि त्याच्या पत्नीसोबत प्रवास करता दिसतो आहे. यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या ढुमे यानं गैरकृत्य केल्याचं यात दसत असल्याचा दावा एबीपी माझानं आपल्या वृत्तात केला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा अहवाल गृहविभागानंही मागवला होता. या अहवालाच्या आधारेच गृहविभागाकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.