NEET- JEE : “माणसं मेली तर चालतील का?” परिक्षेवरुन अभिनेत्याचा मोदींना सवाल!

कोरोना काळातही केंद्राचा आठमुठेपणा कायम,

Actor zeeshan-ayyub-tweet-on-neet-entrance-exam
Actor zeeshan-ayyub-tweet-on-neet-entrance-exam

मुंबई :  राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) आणि राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (JEE) च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली होती. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूब याने नाराजी व्यक्त केली आहे. माणसं मेली तर चालतील का? असा सवाल त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलाव्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका अशी मागणी होत असताना NEET आणि JEE परीक्षा आणि पालकांकडून दबाव असल्यानेच परिक्षा ठरल्या वेळेतच होतील, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं आहे. दरम्यान या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूब याने नाराजी व्यक्त केली आहे. माणसं मेली तर चालतील का? असा सवाल त्याने विचारला आहे.

काय म्हणाला जिशान अय्यूब

. “माणसं मेली तरी चालतील पण परिक्षा पुढे जाता कामा नये, वाह साहेब कमाल आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोनू सुदनेही केली होती मागणी

करोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे. “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. असं सोनू सुदने ट्विटरव्दारे मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here