‘या’अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला बेड्या!

अभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण

actress-sejal-sharma-suicide-case -boyfriend-arrest
actress-sejal-sharma-suicide-case -boyfriend-arrest

ठाणे : सिनेअभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला बेड्या ठोकल्या. (Boyfriend arrest in Actress Sejal Sharma Suicide Case). आदित्य वशिष्ट दिल्लीतील एक जीम इंस्ट्रक्टर आणि मॉडेल आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर प्रेयसी सेजल शर्माला फसवल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

सेजल कृष्णकुमारी शर्मा (वय 26) मिरारोड पूर्वमधील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती. तिने जानेवारीमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (30) याला तपासासाठी बोलावलं होतं. त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मिरारोड पोलिसांनी आदित्य वशिष्टला अटक केली.

न्यायालयात हजर केले असता आरोपी आदित्य वशिष्ट याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेजल शर्माचा मृतदेह 24 जानेवारी रोजी तिच्या मिरा रोड येथील घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. त्या दिवशी सेजलचं केवळ आदित्य वशिष्टशी बोलणं झालं होतं.

या प्रकरणी सेजलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एप्रिलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यात तिच्या आईने आदित्य वशिष्टने सेजलला तिच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन देऊन फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here