कृषी विधेयक मंजूर : 208 शेतकरी संघटनांचा एल्गार, 25 सप्टेंबरला आंदोलन

25 सप्टेंबररोजी 208 संघटना आंदोलन, अजित नवलेंची माहिती

Agriculture Bill passed: Elgar of 208 farmers' organizations, agitation on September 25
Agriculture Bill passed: Elgar of 208 farmers' organizations, agitation on September 25

मुंबई : विरोधकांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात राज्यसभेत कृषीविषयक दोन विधेयकं अखेर मंजूर करण्यात आली. या विधेयकाविरोधात किसान संघर्ष समन्वय समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. 25 सप्टेंबररोजी 208 संघटना आंदोलन करणार आहेत. अशी माहिती अजित नवले यांनी दिली.

आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. (Rajya Sabha passes two agriculture Bills among TMC AAP Congress Opposing)

कृषीविषयक विधेयकांवरुन राज्यसभेत विरोधीपक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या विधेयकाला उत्तर दिले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापतींसमोर असलेली नियम पुस्तिका फाडली. त्याचवेळी काँग्रेस आणि ‘आप’चे खासदार सदनातील वेलमध्ये उतरले.

एवढेच नव्हे तर खासदारांनी सीटसमोर असलेले माइकही तोडले. चर्चेदरम्यान काँग्रेसने हे विधेयक म्हणजे शेतकर्‍यांच्या डेथ वॉरंटवर सही करण्यासारखे असल्याचा घणाघात केला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला.

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले ‘कृषी सुधार विधेयकं मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे सरकार देशाला आश्वासन देऊ शकेल काय? या विधेयकावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे’ अशी मागणी त्यांनी केली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की या विधेयकाबद्दल अफवा पसरवली जात आहे, अशा परिस्थितीत अफवांवरुनच एका मंत्र्याने राजीनामा दिला का?’ असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला होता.

शेतकरी आता आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलनाला सुुरुवात झाली आहे.किसान संघर्ष समन्वय समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. 25 सप्टेंबररोजी आं.दोलन करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here