West Bengal Assembly Election 2021 : ओवैसींना झटका; बंगालमध्ये MIM नेत्याचा ममतांना पाठिंबा!

aimim-west-bengal-state-in-charge-zamirul-hasan-quits-the-party-support-mamata-and-tmc-west-bengal-assmbly-election-2021
aimim-west-bengal-state-in-charge-zamirul-hasan-quits-the-party-support-mamata-and-tmc-west-bengal-assmbly-election-2021

कोलकाता: एआयएमआयएमला AIMIM पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या West Bengal Assembly Election 2021 तोंडावर मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे पश्चिम बंगाल प्रभारी झमीरुल हसन Zamirul Hasan यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला पाठिंबा Support mamata and tmc जाहीर केला आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएमचा ममतांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणुकीआधीच खासदार ओवैसींना झटका बसला आहे. एमआयएमचे पश्चिम बंगाल प्रभारी झमीरुल हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महत्त्वाचं म्हणजे या निकालामुळे उत्साह वाढलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आता बंगालमध्ये प्रचारामुळे राजकीय वातावरण तापत असतानाच ओवैसींना झटका बसला आहे. एमआयएमचे पश्चिम बंगालचे प्रभारी जमीरूल हसन यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला.

हेही वाचा: लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणाही केली. हसन हे इंडियन नॅशनल लीग या पक्षाची स्थापना करणार असून, त्यांनी पक्षाचा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला पाठिंबा असेल, असंही जाहीर केलं आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, इथे इंडियन नॅशनल लीगने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

AIMIM West Bengal state in-charge Zamirul Hasan quits the party. He is joining a separate party ‘Indian National League’ that will support CM and TMC leader Mamata Banerjee in Nandigram.

— ANI (@ANI) March 19, 2021

हसन यांची ही होती नाराजी…

जानेवारीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शरीफ जाकर पीरजादा अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे हसन नाराज झाले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं आता बोललं जात आहे.

“मी २०१५मध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला होता. हा पक्ष बंगालमधील २० जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही कष्ट घेतले. याचा पुरावा म्हणजे देशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला लक्ष्य केलं नाही, मात्र ममतांनी केलं.

हेही वाचा: “नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”; राहुल गांधींचा संघावर हल्लाबोल

आमच्या अनेक लोकांना अटक करण्यात आलं. मलाही अटक करण्यात आलं होतं. मात्र, असदुद्दीन ओवैसी जुन्या लोकांना किंमत देत नसल्याचं जाणवू लागलं होतं. त्यांनी एकदाही अटक करण्यात आलेल्या लोकांबद्दल पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली नाही,” अस हसन यांनी आज तक वृत्तवाहिनाली दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here