राज्यपाल आमदारांच्या नियुक्त्यांबाबत अजित पवार संतापले; म्हणाले…

government-in-majority-has-right-to-take-decisions-deputy-cm-ajit-pwar-when-ask-about-letter-sent-by-bjp-on-pretext-of-eknath-shinde-news-update-today
government-in-majority-has-right-to-take-decisions-deputy-cm-ajit-pwar-when-ask-about-letter-sent-by-bjp-on-pretext-of-eknath-shinde-news-update-today

पुणे: राज्यपाल Governor Bhagat singh koshyari नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit-pawar यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. सर्व नियम आणि अटी पाहून राज्यापालांना 12 नावे दिले आहेत. त्यामुळे, राज्यपालांनी आता अंत पाहू नये, असा संताप पवारांनी व्यक्त केला.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्व नियम आणि अटी पाळून राज्यपालांना 12 नावे दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करुन आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्रंही राज्यापालांना देण्यात आले.

आम्हाला पूर्ण बहुमत असून, सभागृहातही बहुमत सिद्ध झाले आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये’, असे अजित पवार म्हणाले.

पवार पुढे म्हमाले की, ‘राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात केल्या. एवढं सगळं झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत.

त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावंच लागेल. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही?’ असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा

जनतेच्या खिशात काही टाकत नाहीत, आहे ते तरी कशाला ओरबडता?; पेट्रोल दरवाढीवरुन सेनेचा हल्लाबोल

‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन, काही दिवसांपूर्वीच झाले होते कोरोनामुक्त

शेतकरी विरोधी सचिन तेंडुलकरचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या, संभाजी ब्रिगेड आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here