मुंबई l उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
अजित पवारांनी Ajit pawar शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.
पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती.
त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अजित पवार Ajit pawar हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
अजितदादांची प्रकृती अत्यंत ठणठणीत – अमोल मिटकरी
अजितदादांची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे. काल विजयादशमीच्या शुभेच्छा देतानाही आमचा संवाद झाला होता. तेव्हाही दादांची तब्येत ठणठणीत असल्याचं मला जाणवलं. सकाळपासून कामाचा व्याप, लोकांशी संवाद या सगळ्या धकाधकीच्या व्यापामुळे थोडंसं अस्वस्थ वाटलं असणार. ते विलगीकरणात स्वतःच्या घरामध्येच होते.
वाचा l Raghuram Rajanl”अन्यथा देशातील तरुण रस्त्यावर उतरतील”;रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा
आता रुटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेल्याचं मला कळलं. मात्र कुठेही घाबरून जाण्याचं आणि चिंता करण्याचं कारण नाही. अजितदादा ठणठणीत आहेत आणि लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
वाचा l Oily Skin आयुर्वेदिक घरगुती उपायांमुळे तेलकट त्वचेची कटकट होईल दूर