अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, दिलीप वळसे,धनंजय मुंडे, अदीती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

ajit-pawar-took-oath-as-deputy-chief-minister-of-maharashtra-news-update-today
ajit-pawar-took-oath-as-deputy-chief-minister-of-maharashtra-news-update-today

मुंबई: राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, दिलीप वळसे,धनंजय मुंडे, अदीती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here