Alia Bhatt : आलिया भट्टने दिला मुलीला जन्म, कपूर कुटुंबीयांनी लहान परीचं केलं स्वागत

alia-bhatt-arrived-at-the-hospital-with-ranbir-for-delivery-the-wedding-took-place-in-april-news-update-today
alia-bhatt-arrived-at-the-hospital-with-ranbir-for-delivery-the-wedding-took-place-in-april-news-update-today

आलिया भट्टने (Alia Bhatt) गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पालक म्हणून आलिया आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आनंदाला पारावार उरलेला नाही. बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे पॅरेंट क्लबमध्ये सामील झाले आहेत. प्रत्येकजण आलिया-रणबीरचे अभिनंदन करत आहे.

याआधी आलिया नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला बाळाला जन्म देईल, असे बोलले जात होते, परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीला कपूर कुटुंबाने मुलीचे स्वागत केले आहे.

गेल्या महिन्यात झाले होते आलियाचे बेबी शॉवर

अलीकडेच आलियाच्या बेबी शॉवरचे विधी पार पडले. या सोहळ्याला बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विधींमध्ये, भट्ट आणि कपूर कुळ या जोडप्याला आणि त्यांच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. या बेबी शॉवरचे अनेक फोटो आलियाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले होते

रणबीर आणि आलियाने यावर्षी १४एप्रिल रोजी कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. २०१७ मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या वर्षी त्यांनी लग्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here