Arnab goswami l पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींचा दावा कोर्टाने फेटाळला

alibaug-court- arnab-goswami-sent-to-judicial-custody
alibaug-court- arnab-goswami-sent-to-judicial-custody

अलिबाग l  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab goswami यांचा पोलिसांकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अर्णब गोस्वामी Arnab goswami यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते.

माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी Arnab goswami यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा l Arnab Goswami l अर्णब गोस्वामी भाजपाचा कार्यकर्ता आहे का?;शिवसेनेचा भाजपाला सवाल

अर्णव गोस्वामी Arnab goswami यांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जाताना न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी शरीरावरील मारहाणीचे वळ प्रसारमाध्यमांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी मला घेरले आणि माझी मान पकडली. त्यांनी मला ढकलले. मला मारहाण करण्यात आले. मुंबईवरुन मला अलिबागपर्यंत अनवाणीच आणले, असे अर्णव गोस्वामी यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here