Schools Reopening l सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत राहणार बंद

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा राहणार बंद

All schools will remain closed until December 31
All schools will remain closed until December 31

मुंबई l कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबरला शाळा Schools सुरु होणार नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत 31 December मुंबई महापालिका क्षेेत्रातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आय़ुक्त इकबाल सिंग चहल iqbal singh chahal यांनी दिली आहे. हे नियम सर्व शासकीय,खासगी,महापालिका शाळांना लागू असणार आहे. 

कोरोनामुळे 23 नोव्हेंबरला 9 ते 12 व्या वर्गापर्यंत शाळा उघडल्या जाणार होत्या. परंतु कोरोनाची दुसरी लाट येणार आहे. असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिक्षकांची कोरोनाची तपासणी सुरु झाली होती, परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातही हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा l  नितीश कुमारांना धक्का, शिक्षणमंत्र्यांचा 72 तासांमध्ये राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here