अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना सर्व प्रकरणांत जामीन मंजूर

Alt News co-founder mohammed-zubair-gets-bail-in-all-cases-supreme-court-order-to-release-immediate-news-update-today
Alt News co-founder mohammed-zubair-gets-bail-in-all-cases-supreme-court-order-to-release-immediate-news-update-today

नवी दिल्ली : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांची कारागृहातून तत्काळ सुटका करावी, असे निर्देशही न्यायाल्याने दिले आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खडंपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

मोहम्मद जुबेर यांना जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. त्यामुळे त्यांना कलम ३२ अंतर्गत सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. तसेच मोहम्मद जुबेर यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे.

जुबेरने यांनी २०१८ मध्ये पोस्ट केलेल्या कथित आक्षेपार्ह ट्वीटवरून दिल्लीत दाखल केलेल्या गुन्ह्याशिवाय उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, मुझफ्फरनगर, चांदोली येथे एकूण सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच लखीमपूर खेरी, सीतापूर आणि हाथरस येथेही जुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण?

ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे तसेच द्वेषाला उत्तेजन देणे, या आरोपांखाली जुबेर यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ११ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याआधीच जुबेर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच झुबेर यांनी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच लोकांना भडकावणारे ट्वीट केल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करु नये, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी जुबेर यांना विदेशातून निधी मिळाल्याचाही उल्लेख केला. “जुबेर यांनी विदेशातून काही रक्कम स्वीकारलेली असून, अजूनही त्यांनी पैसे देणाऱ्यांची माहिती दिलेली नाही,” असे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले होते.

 दरम्यान, जुबेर यांच्या वकिलांकडून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते. जुबेर यांचे जुने ट्वीट एका निनावी ट्वीटर अकाऊंटने शोधलेले आहे. मात्र, हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या ट्वीटर अकाऊंटच्या मागे नेमकं कोण आहे? हे समोर आलेले नाही. तसेच जुबेर यांनी कोणतीही परदेशातून देणगी स्वीकारलेली नाही, असा दावा जुबेर यांच्या वकिलांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here