औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही; अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

ambadas-danve-question-to-devendra-fadnavis-over-airport-renaming-marathi-news-update-today
ambadas-danve-question-to-devendra-fadnavis-over-airport-renaming-marathi-news-update-today

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याचा दावा करता, मग औरंगाबाद विमानतळाच्या Aurangabad Aairport नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी  केला आहे.

भाजपची मंगळवारी (ता. पाच) शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ‘आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय घेतला आणि त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

त्यावर दानवे यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी ? मग २०१४ ते २०१९ सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही ?

शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती, त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे. ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमचा त्या ‘दुचाकी’ कॅबिनेटची आग झाली होती!

लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा, असा प्रश्न दानवे यांनी फडणवीस यांना केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here