Abdul Sattar : यह ‘मीठा’ है, वो कडू है, अब्दुल सत्तारांचा बच्चू कडूंना टोला

amravati-agriculture-minister-abdul-sattars-hard-comment-on-prahar-organizations-mla-bachu-kadu-mla-rajkumar-patel-news-update-today
amravati-agriculture-minister-abdul-sattars-hard-comment-on-prahar-organizations-mla-bachu-kadu-mla-rajkumar-patel-news-update-today

अमरावतीः कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्यात सत्तारांच्या राजकीय शेरेबाजीची तुफ्फान चर्चा होतेय. नुकतंच त्यांनी केलेलं एक वक्तव्य खूप गाजतंय. मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar patel) यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हसत हसतच बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) निशाणा साधला.

ये मीठा है और वो कडू है.. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठींबा देण्यासाठी गुवाहटीत गेल्यानंतरही बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच विविध नेतेही त्यांना यावरून टोले मारत आहेत. आता अब्दुल सत्तारांच्या या टिप्पणीवर बच्चू कडू काय म्हणतात, हे पहावं लागेल.

माझा एक दिवस बळीराजासाठी  दौरा सुरू…

माझा एक दिवस बळीराजासाठी या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधून सुरुवात झाली. धारणी तालुक्यातल्या सादराबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्रीच दाखल झाले. गावातले शैलेंद्र सावलकर यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला. पहाटे पाच वाजेपासूनच त्यांनी शेतकरी बांधवांशी चर्चा सुरु केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

रानभाजी-भाकरीच्या जेवणाचीही चर्चा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी चुन्नीलाल पटेल यांच्या घरी पाहुणचार घेतला. यावेळी त्यांनी रानभाजी आणि भाकरीचे जेवण केले. कृषीमंत्र्यांनी एवढ्या साधेपणाने शेतकऱ्याचा पाहुणचार स्वीकारल्याने याचीही अमरावतीत जोरदार चर्चा सुरु आहे.

दुश्मन की दुवा करनेवाला मुख्यमंत्री

अब्दुल सत्तार यांनी जळगावात मुक्ताई नगर येथील दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना ते म्हणाले, दुश्मन की दुवा करने वाला मुख्यमंत्री इस राज्य मे है… आमचं सरकार गतिमान आहे. पण याआधीचं सरकार गतीनं गेलं, अशी टिप्पणीही सत्तारांनी केली. सध्याचं सरकार कोणत्याही स्थितीत कोसळणार, मंत्री अपात्र होतील, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील दौऱ्यात केलं होतं.

मिटकरींच्या पोटात का दुखतंय…

मुक्ताईनगरमध्येच अमोल मिटकरी यांना उद्देशून बोलताना, अब्दुल सत्तार म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून कोणताही मुख्यमंत्री एवढा फिरला नसेल. मी फिरतोय तर मिटकरी यांच्या पोटात दुखायला लागलं.. रात्रीच्या वेळी कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दौरा करतात, अशी उपरोधिक टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here