Ananya panday l अभिनेत्री अनन्या पांडे म्हणाली, मला नेहमीच ट्रोल केले जाते…

ananya-panday-reaction-on-trolling
ananya-panday-reaction-on-trolling

अभिनेत्री अनन्या पांडे ananya-panday हिने करीना कपूर खानच्या ‘वॉट विमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने ट्रोलिंगवर वक्तव्य केले. ‘जर ट्रोलिंग विषयी बोलायचे झाले तर मी काही बोलले किंवा कितीही चांगले कपडे परिधान केले तरी मला नेहमीच ट्रोल केले जाते. पण त्याचा परिणाम माझ्यावर होत नाही’ असे अनन्या म्हणाली आहे.

दरम्यान अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरचा अनुभव सांगितला. ती करिअरच्या सुरुवातीला इतरांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा विचार करायची पण आता ती तिला ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करते असे अनन्या म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Diet Sabya (@dietsabya)

अनन्या लवकरच तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करणार आहे. तिला आणि विजय देवरकोंडाला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. या व्यतिरिक्त ती दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा l Ravi Patwardhan l हरहुन्नरी कलाकार रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

‘स्टूडंट ऑफ द इयर २’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर अनन्याने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पिली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here