‘हे’ 23 धोकादायक Apps, तातडीने करा डिलिट

धोकादायक Apps तुमचं अकाउंट करतायेत रिकामं

android-users-23-dangerous-apps-you-must-delete
android-users-23-dangerous-apps-you-must-delete

मोबाइल अ‍ॅप्सद्वारे युजर्सची फसवणूक केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अँड्रॉइड युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देण्यात आला असून 23 धोकादायक अ‍ॅप्स डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

युजर्सच्या नकळत त्यांचे अकाउंट रिकामे करणाऱ्या या धोकादायक अ‍ॅप्सबाबत सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या अभ्यासकांनी खुलासा केला आहे. तसेच 23 धोकादाय अ‍ॅप्सची यादी जाहीर करण्यात आली आहे.

एका वृत्तानुसार, हे सर्व फ्लीसवेअर (fleeceware) अ‍ॅप्स असून गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन केलं आहे. फ्लीसवेअर एकप्रकारचं मॅलवेअर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे. याद्वारे स्पॅम सबस्क्रिप्शन आणि फ्री ट्रायलच्या नावाखाली युजर्सची फसवणूक केली जाते. पण सबस्क्रिप्शन कधी संपणार आणि त्यासाठी किती दर आकारले जाणार याची माहिती दिली जात नाही.

हे अ‍ॅप्स डिलिट केल्यानंतरही युजर्सना सबस्क्रिप्शन कसं कॅन्सल करायचं हे समजत नाही. तसेच, एकदा या अ‍ॅप्समध्ये साइन-अप केल्यानंतर आपोआप तुमच्या परवानगीशिवाय अनेक अ‍ॅप्ससाठी सबस्क्रिप्शन केलं जातं.

अनेकदा युजर्सना कळतही नाही आणि शेकडो मोबाइल अ‍ॅप्ससाठी सबस्क्रिप्शन सुरू होतं. Sophos च्या रिसर्चर्सकडून या 23 धोकादायक अ‍ॅप्सची यादी जाहीर करण्यात आली. मोबाइलमधून हटवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

धोकादायक अ‍ॅप्सची यादी

 • com.photoconverter.fileconverter.jpegconverter
 • com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup
 • com.screenrecorder.gamerecorder.screenrecording
 • com.photogridmixer.instagrid
 • com.compressvideo.videoextractor
 • com.smartsearch.imagessearch
 • com.emmcs.wallpapper
 • com.wallpaper.work.application
 • com.gametris.wallpaper.application
 • com.tell.shortvideo
 • com.csxykk.fontmoji
 • com.video.magician
 • com.el2020xstar.xstar
 • com.dev.palmistryastrology
 • com.dev.furturescope
 • com.fortunemirror
 • com.itools.prankcallfreelite
 • com.isocial.fakechat
 • com.old.me
 • com.myreplica.celebritylikeme.pro
 • com.nineteen.pokeradar
 • com.pokemongo.ivgocalculator
 • com.hy.gscanner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here