बारामती : व्हॉईस ऑफ मीडियाच्या (Voice of Media) दोन दिवसीय कार्यशाळा व चिंतन बैठकीचे आज, ११ मार्च रोजी बारामती येथे उद्घाटन झाले. बारामती येथील बारामती क्लब येथे होत असलेल्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रात काही पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली. आतापर्यंत व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे अनिल म्हस्के (बुलडाणा) यांच्यावर आता व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची (ग्रामीण) जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बुलडाणा येथील असणारे अनिल म्हस्के दैनिक पुण्यनगरीच्या अकोला – बुलडाणा – वाशिम आवृत्तीचे प्रमुख आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाच्या संघटना उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. आधी विदर्भ अध्यक्ष त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या अनिल म्हस्के यांनी सांभाळल्या आहेत.
अनिल म्हस्के पाटील यापुढे व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची ( ग्रामीण) जबाबदारी सांभाळतील अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली. राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, राजा माने, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनिल म्हस्के पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.