‘अँनिमल’ फेम अभिनेत्याने वाचवलेला आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

animal-actor-manjot-singh-once-saved-girl-from-attempting-suicide-video-viral-news-update-today
animal-actor-manjot-singh-once-saved-girl-from-attempting-suicide-video-viral-news-update-today

‘अँनिमल’ फेम अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता आत्महत्या करणाऱ्या एका मुलीला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे, पण तो व्हायरल झाल्यानंतर सर्वजण मनजोत सिंगचे खूप कौतुक करत आहेत.

मनजोत सिंगचा २०१९ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तो एका मुलीला वाचवताना दिसत आहे. ती मुलगी कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. हा व्हिडीओ २०१९ मधील आहे, तेव्हा मनजोत ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातून बीटेक करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by RoYaL (@royal_manjjot_singhh)

व्हिडीओ शेअर करताना मनजोतने लिहिलं, “हे २०१९ मध्ये घडलं होतं. एक मुलगी आत्महत्या करत होती आणि देवाच्या कृपेने मी तिला वाचवू शकलो, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना आयुष्यात अनेक समस्या आणि संकटांचा सामना करावा लागतो पण कधीकधी त्यांचा सामना करून जगणं हेदेखील धैर्याचं काम आहे.

नजोतने त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याचे चाहते व नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. ‘तू खूप चांगलं काम केलंस’, ‘तुझा खूप अभिमान आहे’, ‘तू रिअल लाइफ हिरो आहेस’, ‘हे घडलं त्यावेळी मी तिथे होते, मी घडलेला प्रकार माझ्या डोळ्यांनी पाहिला होता, तू तिथे वेळेवर पोहोचल्यानेच त्या मुलीचा जीव वाचला,’ अशा कमेंट्स त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी व त्याच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here