अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

आदित्य पौडवालची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

anuradha-paudwal-son-aditya-paudwal-dies
anuradha-paudwal-son-aditya-paudwal-dies

मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा म्युझिक अरेंजर, निर्माता आदित्य पौडवालचे निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता.

आदित्यचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगितविश्वात ओळख होती. सर्वात कमी वयाचा संगीत निर्देशक म्हणून आदित्य पौडवालची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here