Anvay-naik l अन्वय नाईक प्रकरण, आरोपत्राविरोधात अर्णब गोस्वामींची पुन्हा हायकोर्टात धाव

anvay-naik-arnab-goswami-case-bombay-high-court-new-petition
anvay-naik-arnab-goswami-case-bombay-high-court-new-petition

मुंबई l अन्वय नाईक Anvay-naik आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.bombay-high-court या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab-goswami यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती अर्जाद्वारे  केली आहे.

अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती अर्जाद्वारे अर्णब गोस्वामी यांनी केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी अर्णब गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे वर्ग करावा.

हेही वाचा l एकटेट लढणार व जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली

अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाव्दारे केली आहे. मात्र पोलिसांनी काल दाखल केलेल्या अर्जामुळे आज त्यांनी पुन्हा नवीन अर्ज केला. अलिबाग न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊ नये.

संपूर्ण तपासाला स्थगिती द्यावी. अशी मागणी याचिकेत केली आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय हा तपास सुरु झाला आहे. असा दावा गोस्वामी यांनी केली आहे.