iphone 12 लाँच, पाहा किंमती आणि फिचर्स

पाहा video, पाच नवीन रंगांमध्ये केले लाँच

apple-iphone-12-launched-know-its-amazing-features-and-price
apple-iphone-12-launched-know-its-amazing-features-and-price

Apple ने आयफोन 12 (iPhone 12) लाँच केला आहे. Iphone 12 price in India Apple ने आयफोन 12 ला आणखी पाच नवीन रंगांमध्ये लाँच केलं आहे. ज्यामध्ये निळा आणि लाल, काळा, पांढरा आणि हिरवा यांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचा असा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.

Apple मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टीम कुक (Tim Cook) यांनी स्वत: हा स्मार्टफोन लाँच करत याचे फीचर्स जगासमोर आणले आहेत. टिम कुक यांनी हा व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून हा नवा स्मार्टफोन लाँच केला. यावेळी त्यांनी अॅपलच्या गतकाळातील आठवणींना देखील उजाळा दिला. हा व्हर्च्युअल इव्हेंट ३० लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी पाहिला.

iPhone 12 Pro Max ची किंमत 1,099 डॉलरपासून सुरू होईल तर iPhone 12 Pro ची किंमत 999 डॉलरपासून सुरू होणार आहे. Apple ने आयफोन 12 ला आणखी पाच नवीन रंगांमध्ये लाँच केलं आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचा असा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.

आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे जे फोनला पूर्वीपेक्षा टिकाऊ बनवते. आयफोन 12मध्ये चारपट चांगला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आयफोन 12 A14 बायोनिकद्वारे संचालित आहे.

कॅमेरा

आयफोन 12 मध्ये बारा मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 एमपी वाइड एंगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे. आयफोन 12 चा कॅमेरा हा कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यास सक्षम आहे. असा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने आपल्या नाईट मोडमध्येही सुधारणा केली आहे. नाईट मोड आता सर्व आयफोन 12 मॉडेल्समध्ये फ्रंट आणि रिअर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये असणार आहे.

apple-iphone-12-launched

5 जी सपोर्ट 

प्रथमच  5G सपोर्ट असलेला आयफोन बाजारात आला आहे. अॅपलने प्रथमच 5जी आयफोन आणण्यासाठी Verizon शी भागीदारी केली आहे. यावेळी टीम कूकने होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकर देखील लाँच केले. अॅपलने यासाठी यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल बरंच काही सांगितलं आहे.

apple-iphone-12-launched

होमपॉड मिनी एक नवीन डिझाइन आणि सातत्याने 360 डिग्री साउंडचा अनुभव प्रदान करण्यात सक्षम आहे. स्मार्ट स्पीकर हा सिरी (Siri) सपोर्टसह आला आहे. यात आपण आयफोनचा वापर करून कॉल, मेसेज आणि मेल देखील करू शकता. हा आपल्यासाठी दोन रंगात उपलब्ध असणार आहे. ज्याची किंमत ९९ डॉलरपासून सुरू होते. ५ नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होणार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here