Apple Watch Series 7 l Apple वॉच सिरिज ७; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

apple-watch-series-7-introducing-the-company-watch-know-the-price-and-specification-news-update
apple-watch-series-7-introducing-the-company-watch-know-the-price-and-specification-news-update

Apple कंपनीने आयफोन १३ सिरिजसह Apple  वॉच सीरीज ७ आणि वॉच सीरीज (Apple Watch Series 7) देखील लॉंच केली आहे. Apple ने या कार्यक्रमाद्वारे सांगितले की, Apple वॉच सिरिज ७, तसेच सिरिज ६ या मध्ये जास्त बदल नाही. या वॉच मधील काही फीचर्स सामान्य मानली जाऊ शकतात. दरम्यान Apple वॉच सिरिज ७ मध्ये मोठा रेटिना डिस्प्ले देण्यात आला असून यामधला हा सर्वात मोठा बदल त्यांनी यावेळी केला आहे.

Apple वॉच ७ मध्ये मोठ्या स्क्रीनच्या कीबोर्डला सपोर्ट देण्यात आलाय. ज्याने तुम्ही सहज मेसेजचा रीप्लाय या वॉच मधून देता येणार आहे. विशेषतः या सिरिज ७ मध्ये नवीन वॉचफेस देण्यात आलेला आहे.

Apple वॉच सीरीज ७ हा फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. तसेच हा वॉच तुम्हाला पाच नवीन एल्युमिनियम रंगाच्या ऑप्शनसह विकत घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला सिल्व्हर, ग्रेफाइट आणि गोल्ड स्टेनलेस स्टील या रंगामध्ये विकत घेता येणार आहे.

Appleवॉच सिरिज ७ ची किंमत

Apple वॉच सिरिज ७ हा अंदाजे २९,३७९ या किंमतीत लॉंच करण्यात आलेला आहे. तसेच कंपनीने यात जुन्या दोन वॉच मॉडेलची विक्री सुर ठेवली आहे. यात Apple सिरिज ३ ची किंमत आता १४,६५३ रुपये इतकी असून अॅपल वॉच एसई (Apple Watch SE) ची किंमत आता अंदाजे २०,५४३ इतकी या इव्हेंट दरम्यान करण्यात आलेली आहे.

Apple वॉच सिरिज ७ चे स्पेसिफिकेशन

नवीन Apple वॉच सीरीज ७ फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Apple वॉच सिरिज ७ (Apple Watch Series 7) कंपनीची आतापर्यंतची सर्वात मजबूत Apple वॉच आहे, अस यावेळी कंपनीने म्हंटले आहे. तसेच वर्कआउट करताना यातील फॉल डिटेक्शन फीचर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. Apple वॉच सिरिज ७ सीरिज ४१mm आणि ४५mm अशा दोन साईजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

अँपल वॉच सीरीज ७ IP6X डस्ट रेजिस्टेंससह सादर करण्यात आले आहे. ही सीरिज १८ तासांचा बॅटरी लाईफ देईल. जुन्या वॉच सीरीजच्या तुलनेत ही सीरिज USB-C च्या मदतीने ३० टक्के जास्त वेगाने चार्जिंग करता येईल. यातील watchOS ८ क्विकपाथसह एका फुल कीबोर्डला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये ईसीजी आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर सारखे फिचर मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here