Apple online store : Apple भारतात लाँच करणार ऑनलाइन स्टोअर!

apple-will-launch-its-first-online-store-by-october-physical-store
apple-will-launch-its-first-online-store-by-october-physical-store

नवी दिल्ली : प्रसिध्द अ‍ॅपल कंपनी भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे. अ‍ॅपल सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारी महिन्यातही अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी यावर्षाच्या अखेरीस अ‍ॅपल भारतात ऑनलाइन स्टोअर लाँच करणार असल्याचं म्हटलं होतं. तर भारतातील पहिलं फिजिकल स्टोअर २०२१ मध्ये सुरू करणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

पुढील काही महिन्यांमध्ये येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं ऑनलाइन स्टोअर लाँच करण्याचा विचार केला असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात सध्या अ‍ॅपल भारतात थर्ड पार्टी विक्रेते तसंच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या मोबाइल फोनची विक्री करते.

सरकारनं गेल्यावर्षी सिंगल ब्रँड रिटेलला प्रोत्साहन देत थेट परदेशी गुंतवणुकीशी निगडीत मार्गदर्शक सुचनांमध्ये थोडी सुट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपन्यांना लोकल सोर्सिंगच्या नियमांमध्ये थोडा दिलासा मिळाला होता.

ऑनलाइन रिटेल ट्रेडिंगमध्ये जाण्यापूर्वी कंपनीचं एखादं स्टोअरही असावं हा नियमही रद्द केला होता. सरकारच्या या निर्णयानंतर अ‍ॅपलनं भारतीय युझर्ससाठी जागतिक स्तरावरील ऑनलाइन आणि इन स्टोअर अनुभव देण्यासाठी फोकस करत असल्याचं म्हटलं होतं.

भारतात विस्ट्रॉन- फॉक्सनकॉनसोबत iPhone 11 चं असेंबलिंग सुरु

कंपनीनं भारतात विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉनसोबत एकत्र येत iPhone 11 चं असेंबलिंग सुरू केलं आहे. तामिळनाडूतील फॉक्सकॉनच्या प्रकल्पात iPhone 11 चं असेंबलिंग सुरू  आहे. भारतात असेंबलिंग सुरू केलेलं अॅपलचं हे पाचवं मॉडेल आहे. यापूर्वी iPhone 7, iPhone XR, iPhone 6s आणि iPhone SE चं असेंबलिंग भारतात करण्यात आलं होतं.

अ‍ॅपलची भारतीय बाजारपेठेत प्रिमिअम कॅटेगरीमध्ये सॅमसंग आणि वनप्लसशी स्पर्धा

भारतीय बाजारपेठेत अ‍ॅपलची प्रिमिअम कॅटेगरीमध्ये सॅमसंग आणि वनप्लसशी स्पर्धा आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅपल भारतीय बाजारपेठेतील आपलं स्थान अधिक बळकट करण्याचाही प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here