सोन्याच्या दागिन्यांचा मोफत विमा ही ग्राहकांसाठी फायदेशीर योजना आहे. पण याबाबत जागरूकता कमी आहे. चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या वाढत्या घटना पाहता ही योजना खूप उपयोगी आहे. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ज्या दुकानातून सोनं खरेदी करता तिथे दागिन्यांसाठी मोफत विमा मिळतो. या योजनेचा फायदा कसा घ्यावा हे अनेक ग्राहकांना माहित नाही.
सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणे फायद्याचे ठरते. काही लोक सोन्यात गुंतवणूक करतात, तर काही थेट दागिने खरेदी करतात. दागिने लग्न, समारंभात वापरता येतात. पण दागिन्यांचा चोरीचा धोका असतो. पण दागिन्यांसोबत मोफत विमाही मिळतो. तुम्ही दागिन्यांची खरेदी करता, तेव्हा दुकानदार मोफत विमा देतात. हा विमा तुमच्या दागिन्यांचे नुकसान झाल्यास उपयोगी ठरतो. दागिने हरवले, चोरी झाली, तर हा विमा तुम्हाला आधार देतो. पण बऱ्याच जणांना या योजनेची माहितीच नसते. त्यामुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.
विम्यात काय मिळते?
मोफत विमा दागिन्यांचे अनेक प्रकारच्या नुकसानापासून संरक्षण करतो. भूकंप, पूर, दंगल, साखळी हिसकावणे, दरोडा, अपघात यांसारख्या घटनांमुळे दागिन्यांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देतो. यामुळे तुम्ही निश्चित राहू शकता. हा विमा तुमच्या दागिन्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
विमा क्लेम कसा कराल?
विमा क्लेम करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. दागिने चोरी झाले किंवा हरवले, तर तातडीने विमा कंपनीला कळवावे. यासाठी कंपनीचा टोल-फ्री क्रमांक किंवा ईमेलवर। संपर्क साधावा, क्लेमसाठी पक्के बिल, दागिन्यांचे फोटो आणि इतर कागदपत्रे आवश्यक असतात. पडताळणीनंतर तुम्हाला विम्याची रक्कम मिळते.
सर्वच दुकानदार विमा देत नाहीत
सर्व दुकानदार सोन्याचा विमा देत नाहीत, त्यासाठी सोने खरेदी करताना दुकानदाराला विचारपूस करूनच सोने खरेदी करावे. जेणेकरून तुम्हाला विमा मिळू शकेल. विमा नसेल तर ते तुमचे नुकसान आहे.
विम्याचे नूतनीकरण करता येतं का?
ज्वेलर्सकडून मिळणारा मोफत विमा एक वर्षासाठी असतो. प्रत्येक दुकानदाराचे याचे नियम वेगवेगळे असू शकतात. हा विमा पुढे चालू ठेवता येऊ शकतो. काही दुकानदार ही सुविधा देतात, तर काही देत नाहीत. जर तुम्हाला विम्याचे नूतनीकरण करायचे असेल, तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागतं. एक वर्षानंतर पुन्हा नूतनीकरण करूण तुम्ही विमा घेऊ शकतात.
























































































































































































