रोज पेनकिलर घेत आहात ? वेदनाशामक औषधांचे ‘हे’ दुष्परिणाम माहीत आहेत का ?

are-you-taking-painkillers-daily-are-you-aware-of-these-side-effects-of-painkillers-news-update-today
are-you-taking-painkillers-daily-are-you-aware-of-these-side-effects-of-painkillers-news-update-today

अनेक जण वेदना जाणवू लागल्या तर वेदनाशामक औषधे म्हणजे ‘पेनकिलर’Painkillers घेतात. डोकेदुखी पासून अंगदुखीपर्यंत सर्व दुखण्यांवर सर्रास पेनकिलर घेतली जाते. काहीजण डॉक्टरकडे जाण्यास वेळ नसतो म्हणून ‘पेनकिलर’ घेत राहतात. परंतु, पेनकिलर अतिप्रमाणात घेणे किंवा रोज घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटाचे विकारही उद्भवू शकतात. पेनकिलरचे अतिरिक्त सेवन केल्यास काय परिणाम होऊ शकतात, हे माहीत असणे आवश्यक आहे.

वेदनाशामक औषधांची सवय

हात-पाय दुखी, डोकेदुखी, अंगदुखी यावर सहजरित्या ‘पेनकिलर’ घेतल्या जातात. त्या सहज उपलब्ध असतात. त्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही. गोळी घेऊन लगेच बरे वाटते आणि आपली दैनंदिन कामे पुन्हा करता येऊ शकतात. मणिपाल हॉस्पिटल्स, द्वारकाचे डॉ. संजय गुप्ता यांच्या मते, दोन प्रकारची वेदनाशामक औषधे आहेत, पॅरासिटामॉल-आधारित आणि NSAIDs किंवा डायक्लोफेनाक, सोडियम, ibuprofen, प्रोफेन, aceclofenac, यांसारखी नॉन-स्टेरॉइड विरोधी दाहक औषधे आहेत. ही वेदनाशामक औषधे सहज उपलब्ध असू शकतात. परंतु त्यांचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 ‘पेनकिलर’चे दुष्परिणाम

डॉ गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ३-४ महिन्यांसाठी दररोज १ ग्रॅमपेक्षा जास्त पॅरासिटॅमॉलचे सेवन केल्यास यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र नुकसान होऊ शकते. जरी १ ग्रॅम पॅरासिटॅमॉलमुळे NSAIDs इतके नुकसान होत नाही, तरीही त्याचे जास्त सेवन करू नये. NSAIDs च्या अधिक सेवनाने यकृताला इजा होऊ शकते. जठराला सूज येणे, गॅस्ट्रिक अल्सर, मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अन्ननलिकेच्या अंतिम टोकाला दुखापत होऊ शकते. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ NSAIDs सेवन केल्याने मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होते.”

 वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामांची लक्षणे

वेदनाशामक औषधांमुळे तुमच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला असेल, तर तुमच्या लघवीचेही प्रमाण कमी होईल. यकृतावर परिणाम झाला असेल तर यकृताच्या जागी म्हणजे तुमच्या उजव्या बरगडीच्या खाली तीव्र वेदना होतील. यकृताचे कार्य कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम रक्त गोठण्यावर होतो.

यकृत रक्त गोठवण्याचे घटक निर्माण करते. यकृतावर परिणाम झाल्यामुळे रक्तस्रावाचे प्रमाण वाढते, तसेच रक्त गोठण्याचेही प्रमाण कमी होते. इतर धोक्याच्या लक्षणांमध्ये शरीरावर सूज येणे, चालताना धाप लागणे यांचा समावेश होतो. जठराला सूज, जठरासंबंधी अल्सर येतात. पोटात वेदना होतात आणि अस्वस्थता, खोकला जाणवतो. काहीवेळा खोकल्यावर रक्तदेखील येऊ शकते. जर रक्ताच्या उलट्या होत असतील, तर तुमचा अल्सर सच्छिद्र झालेला असण्याची शक्यता असते. अशावेळी वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here