अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारनं दाबलं; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक पत्रकारीतेशी संबंधित नाही

jayant-patil-criticizes-devendra-fadnavis-claims-will-win-2024-assembly-election-news-update-today
jayant-patil-criticizes-devendra-fadnavis-claims-will-win-2024-assembly-election-news-update-today

मुंबई l रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी अन्वय नाईक प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांच्या अटकेवरून भाजपा महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील jayant patil यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पूर्वीच्या फडणवीस सरकारनं प्रकरण दाबलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील jayant patil पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक पत्रकारीतेशी संबंधित नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली.

या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. ते एकटेच नाही, तर आणखी दोघांची नावं त्यात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे,” अशी भूमिका जयंत पाटील jayant patil यांनी मांडली.

हेही वाचा l “सुशांत सिंह बद्दलची भावना भाजपा नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”

“नाईक कुटुंबीयांनी न्यायालयाला विनंती केली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आलं. पूर्वीच्या सरकारनं हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो.

हेही वाचा l मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले

पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला. आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. याप्रकरणात राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे,” असं म्हणत पाटील यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला.

 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here