Arnab Goswami l अर्णब गोस्वामींचा मुक्काम तळोजा कारागृहात

arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea
arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea

नवी मुंबई अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami अलिबाग येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम आता तळोजा कारागृहात राहणार आहे. 

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीसाठी अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी सोमवार, ९ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतल्याने  सुनावणी स्थगित करण्यात आली.

हेही वाचा l Joe Biden l जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा यांना अलिबाग पोलिसांनी ४ नोव्हेंबरला अटक केली होती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज केला होता.

वास्तविक आधी कनिष्ठ न्यायालय आणि नंतर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यावर उच्च न्यायालयात अर्ज केला जातो. फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४३९नुसार उच्च न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार असल्याचेही साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

शिवाय फेरतपासासाठी महानगरदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक बेकायदा असून त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.


 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here