Aryan khan Drug Case:आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे २५ कोटींची मागणी, समीर वानखेडेंचा ८ कोटींचा हिस्सा!

आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा मोठा खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता. मात्र प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठं बिंग फोडलं आहे.

aryan-khan-drug-case-new-twist-kp-gosavi-bodyguard-prabhakar-sail-affidavit-ncb-sameer-wankhede-news-update
aryan-khan-drug-case-new-twist-kp-gosavi-bodyguard-prabhakar-sail-affidavit-ncb-sameer-wankhede-news-update

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan khan) अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. याच दरम्यान याप्रकरणातील मोठा गौप्यस्फोट झाला आहे. याप्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा मोठा खुलासा किरण गोसावीचा (kp gosavi) बॉडीगार्ड प्रभाकर साईलने (Prabhakar sail) केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता. मात्र प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठं बिंग फोडलं आहे. यामुळे सध्या एकच खळबळ माजली आहे.

एनसीबी रेडचा पंच क्रमांक १ असलेला प्रभाकर साईलने याप्रकरणात त्याच्याकडून पंच म्हणून काही रिकाम्या पेपरवर सही घेतल्याचे सांगितले आहे. रेडच्या दिवशी किरण गोसावी प्रभाकर साईलला येलो गेटवर बोलावले आणि त्यानंतर गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. या सर्व प्रकरणामुळे साईलच्या जीवाला धोका होता म्हणून तो १०-१२ दिवस सोलपूर येथील परिचिताकडे राहिल्याचे सांगितले.

साईलने गोसावीचा लपून व्हिडिओ केला असून त्यात आर्यनला मोबाईलवर बोलायला लावलंत असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साईलने आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. पण ही डील १८ कोटींवर झाली. त्यातले ८ कोटी सॅम म्हणजेच समीर वानखेडेंना आणि उर्वरित पैसे आपल्यात वाटू घ्यायचे असे गोसावी यांच्यात ठरले, असे सर्व संभाषण साईलने ऐकल्याचे व्हिडिओतून सांगितले आहे.

प्रभाकर साईल हा किरण गोसावीकडे अंगरक्षक म्हणून २२ जुलै २०२१ला रुजू झाला. पण वैयक्तिक प्रोब्लेममुळे प्रभाकर साईल ३० जुलै २०२१ रोजी सर्व कपडे घेऊन कायमचा किरण गोसावीकडे ठाण्याच्या राहत्या घरी राहायला गेला. प्रभाकर साईलचं राहणं, पगार सर्व काही ठरलं. पण ८ सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील राहत घर सोडलं आणि त्यानंतर वाशीला शिफ्ट झाले, असे प्रभाकरने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here