मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) याला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकजुटीने त्याला पाठिंबा देत आहे. आता प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर (Raj Babbar) यांनीही शाहरुख खान आणि आर्यन खानला पाठिंबा दिला आहे.
आर्यन खानच्या अटकेनंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुखच्या घरी गेले तर काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा दिला. राज बब्बर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे. त्यांनी एक ट्वीट करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे.
“तो आला लढला आणि त्याने विजय मिळवला. शाहरुखला बऱ्याच काळापासून ओळखत आहे, त्याच्या आत्म्याला या कठीण काळात थोडाही धक्का बसणार नाही. जसे जग त्याच्या लहान मुलाला त्या जखमांद्वारे शिकवते, मला खात्री आहे की योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल. आशीर्वाद,” अशा आशयाचे ट्वीट राज यांनी केले आहे.
He came faced & achieved a conquest unparalleled. Hv known @iamsrk for long to know hardships won’t deter his soul. As the world teaches his young boy thru wounds, am sure the fighter’s son will definitely fight back. Blessings to the young man.
— Raj Babbar (@RajBabbarMP) October 10, 2021
राज यांनी केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राज यांच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. यामध्ये शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
दरम्यान, आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.