समीर वानखेडेंकडून अखेर आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला!;नवाब मलिक म्हणाले….

supriya-sule-says-whatever-nawab-malik-said-about-sameer-wankhede-came-true- Cordelia Cruise Drug case
supriya-sule-says-whatever-nawab-malik-said-about-sameer-wankhede-came-true- Cordelia Cruise Drug case

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (Mumbai cruise Drug case) सुपरस्टार शाहरुख खान (Sharukh khan) याचा मुलगा आर्यन खानला अटक (Aryan Khan Arrest case) करणे अंमली विरोधी पथक अर्थात एनसीबीचे (Ncb) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना चांगलेच भोवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपांचा सामना करणाऱ्या एनसीबीने अखेर समीर वानखेडे यांची या प्रकरणातून गच्छंती केली आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहे. 

एनसीबीनं मोठा निर्णय घेतला असून समीर वानखेडेंकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्वीट करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही तर फक्त सुरुवात आहे, असा इशारा दिला आहे.

समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

एनसीबीने एसआयटी स्थापन केली आहे. मुंबईतील प्रकरणं सेंट्रल युनिटकडे हलवण्यात आली आहे. आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना बाजूला करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खानच्या चौकशीतून हटवण्यात आले असून या प्रकरणाचा आता दिल्लीची टीम तपास करणार आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशात डीजी एनसीबीने एनसीबी मुंबई झोनल युनिटमधून 5 प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत.

अरमान खान आणि आर्यन खान सारखी ही काही बॉलिवूड प्रकरणे आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणाचा तपास पाहणार आहे.  संजय सिंग एनसीबीमध्ये डीडीजी ऑपरेशन्स आहेत. ही संवेदनशील प्रकरणे हलवण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नव्याने तपास पुराव्यानिशी केला जाणार असल्याची माहितीसमोर आली आहे.

सेंट्रल युनिट मॉनिटरिंगमुळे आर्यन खानसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दलचा अनावश्यक वाद टाळता येईल, अशी भूमिका एनसीबीने घेतली आहे. या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा टेकओव्हर चौकशीसाठी संजय सिंह उद्या टीमसह मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here