Assembly Election 2021 l पाच राज्यात ४७५ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला;बंगालमध्ये 14.62 टक्के मतदान

२० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार

zilla-parishad-panchayat-samiti-by-elections-announced-election-commission-announces-news-update
zilla-parishad-panchayat-samiti-by-elections-announced-election-commission-announces-news-update

नवी दिल्ली: तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. २० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे.assembly-election-2021-polling-begins-in-tamil-nadu-assam-west-bengal-kerala-puducherry-news-updates

तामिळनाडूत सहा कोटी मतदार बजावणार हक्क तामिळनाडूत २३४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३९९८ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय कमल हासन आपल्या मुलींसोबत पोहोचले होते.

हेही वाचा: मोठी बातमी : परीक्षार्थी, वाहनचालकांसह स्वयंपाकी, घर कामगारांनाही निर्बंधातून सूट

मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी खासकरुन तरुणांना विनंती केली आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी चार भाषांमध्ये ट्विट केलं आहे.

तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये ४०, पश्चिम बंगालमध्ये ३१ आणि पुद्दुचेरीत ३० जागांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठीदेखील मतदान होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here