उध्दव ठाकरेंच्या फार्म हाऊसची ‘रेकी’, तिघांना ATS ने उचलले

ATS detains-three-arrested-for-reiki-of-cms-farm-house- raigad
ATS detains-three-arrested-for-reiki-of-cms-farm-house- raigad

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या रायगड जिल्ह्यातील  भिलवले येथील फार्म हाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खालापूर तालुक्यातील भिलवले येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तीन ते चार जण प्रवासी कारमधून येऊन रेकी करत होते. सुरक्षा रक्षकाकडे ठाकरे यांचा फार्म हाऊस कुठे आहे? अशी विचारणाही केली.

दरम्यान, सुरक्षा रक्षकाला संशय आल्याने त्याने माहिती देण्यास नकार दिला. थोड्यावेळानी पुन्हा हे तिघं मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले. सुरक्षा रक्षकाशी माहिती का दिली नाहीस? असे म्हणत वाद घातला. शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व निघून गेले. यानंतर सुरक्षा रक्षकाने ही माहिती तातडीने पोलीसांना कळवली.

रेकी करणा-या तिघाजणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलीसांनी तातडीने या तिघांचा शोध सुरु केला. तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. मध्यरात्री तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.

अनुज कुमार, यशपाल सिंग आणि प्रदिप धनावडे अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५२. ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक काईंगडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here