औरंगाबाद: तुझ्यामुळे माझा भाचा अजिंक्य दारुच्या आहारी गेला. तु दारू पित जाऊ नको. तू रुममध्ये दारु का पितो असे अलका गोपाळकृष्ण तळणीकर (वय ७०) या वृध्देने भाडेकरु अशोक वैष्णव याला चिडून सांगितले. वैष्णवला राग आल्याने त्याने अलका तळणीकर यांच्याशी वाद घातला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वैष्णवने अलका तळकणीर यांचे हात पाय, तोंडाला बांधून त्यांचा खून केला. अशी कबूली आरोपीने दिली. अशी माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी दिली.
पैठण गेट ते निराला बाजार रस्त्यावरील शारदाश्रम कॉलनीत श्री निवास इमारतीत बुधवारी (दि. ४) वृद्ध महिलेची हातपाय आणि तोंडाला चिकटपट्टी बांधून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अलका गोपाळकृष्ण तळणीकर (वय ७०) रा. असे वृद्धेचे नाव आहे. वृध्देच्या हत्याप्रकरणी बहिणीचा मुलगा अजिंक्य तळणीकर, भाडेकरु अशोक वैष्णव, सिध्दांत राऊत विद्यार्थी दोघे भाडेकरु यांना क्रांती चौक पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
अलका गोपाळकृष्ण तळणीकर यांची शारदाश्रम कॉलनीत श्री निवास ही इमारत असून त्या इमारतीत त्या बहिणीचा मुलगा अजिंक्य सोबत घेऊन राहत होत्या. पतीपासून त्या ३५ वर्षापासून विभक्त राहत असून पती राजेश परदेशी, अमित परदेशी हे शिरढोण, ता. कळंब जि.धाराशिव येथे राहतात. अलका तळणीकर या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होत्या. त्यांच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावरील काही खोल्या ह्या भाडयाने दिल्या होत्या. त्यामध्ये काही विद्यार्थी तसेच खासगी काम करणारे भाडेकरु होते. तर खालच्या मजल्यावर मेस व स्पर्धा परिक्षेसाठी राहणारे विद्यार्थी होते.
बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भाडेकरु अशोक वैष्णव हा ड्रायव्हर असून त्याने खूनाची माहिती इमारतीच्या खाली माऊली मेस चालवणारे भाडेकरु शंकर तिवारी यांच्याजवळ आला. माझ्यासोबत चला खून झाला असे सांगून वर घेऊन गेला. त्याचवेळी अलका तळणीकरच्या बहिणीची मुलगा अजिंक्य याचाही फोन शंकर तिवारींना आला. मावशीला दवाखान्यात घेऊ जा. मी बाहेर आहे असे सांगितले. शंकर तिवारींनी अजिंक्यला सांगितले मी तुझ्या मावशीला हात लावत नाही असे सांगितले. त्यानंतर शंकर तिवारींनी अलका तळकणीकर यांचे नातेवाईक विशाल पांडे यांना फोन करुन ही माहिती दिली. शंकर तिवारींनी खूनाची माहिती क्रांतीचौक पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. असे शंकर तिवारींनी सांगितले.
पतीपासून राहत होत्या विभक्त
अलका गोपाळकृष्ण तळणीकर ह्या गेल्या ३० ते ३५ वर्षापासून पती राजेश परदेशीपासून विभक्त राहत होत्या. पती राजेश परदेशी, आणि मुलगा अमित परदेशी हे शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव येथेच राहतात. पती राजेश परदेशी हे शेती करतात. तर मुलगा अमित मेडिकल स्टोअर्स चालवतो.
मृतक बहिणीचा मुलगा जवळ राहत होता
अलका तळणीकर यांच्या बहिणीचे ३२ वर्षापूर्वी निधन झाले. बहिणीची मुलगा अजिंक्यला त्याचे मामा अनिल तळणीकर यांनी दत्तक घेतले होते. अजिंक्य हा मावशी अलका तळणीकर जवळ राहत होता. अजिंक्यला व्यसन होते. तो मावशी अलका तळणीकरकडे राहत होता. अलका तळणीकर आणि अजिंक्य हे दोघेच राहत होते. अजिंक्य अविवाहीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो घरीच राहत होते. कोणतेही काम तो करत नव्हता. अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.
एक भाऊ पुण्याला तर एक परदेशात…
अलका तळणीकर यांना दोन भाऊ असून ते मुळचे मेहकर जि.बुलढाणा येथील रहिवासी आहे. अभय तळणीकर हे व्यवसायाने वकील असून ते पुणे येथे राहतात मोठे बंधू हे अनिल तळणीकर हे केमिकल इंजिनीयर आहेत ते यूएसएला स्थायिक झाले आहेत.
मामाचा यूएसहून रात्री २ वाजता आला फोन…
अलका तळणीकर यांचा मुलगा अमित परदेशी याने सांगितले की, रात्री २ वाजता आईच्या खूनाची माहिती मामा अनिल तळणीकर यांनी मला यूएसहून फोन करुन दिली. त्याचवेळी आम्ही शिराढोण येथून जि.धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगरात आलो. मी आईला अधून मधून भेटीसाठी येत होतो.