औरंगाबाद पदवीधर निकाल l ‘मविआ’च्या सतीश चव्हाणांची विजयाची हॅट्ट्रीक

भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव,देवेंद्र फडणवीसांना धक्का

aurangabad mahavikas aaghadi's satish chavan win aurangabad graduate contituency election
aurangabad mahavikas aaghadi's satish chavan win aurangabad graduate contituency election

औरंगाबाद l मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण Satish chavan यांचा विजय झाला आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत aurangabad graduate contituency राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हॅट्ट्रीक साधली.

भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केला.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयासाठी 109409 मताचा कोटा ठरवण्यात आला होता. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी झाले.

औरंगाबाद पदवीधरसाठी दुपारी तीन वाजता मजमोजणीला सुरुवात झाली. सतीश चव्हाण पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना 27850 तर शिरीष बोराळकर यांना 11558 मते मिळाली होती.

दुसऱ्या फेरीअखेर 28930 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 42 हजार मतांची आघाडी मिळाली होती.

तिसरी फेरीत सतीश चव्हाण यांना 26739 तर शिरीष बोराळकर 14471 मते मिळाली. या फेरीत चव्हाण यांना 12268 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 41198 मतांनी आघाडीवर होते.

चव्हाण यांना एकूण 81216 मते तर शिरीष बोराळकर 40018 मते पडली. तिसऱ्या फेरीत 5374 मते अवैध ठरली.

चौथ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 53611 मतांनी आघाडीवर होते. त्यांना 107916 मते तर शिरीष बोराळकर यांना 54305 मते पडली.

या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. या फेरीअखेर भाजपच्या सर्व प्रतिनिधींनी मतदान केंद्र सोडले.

हेही वाचा l  Xiaomi शाओमीचा स्मार्टफोन झाला स्वस्त,पाहा किमत फीचर्स

पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. यासोबतच सतीश चव्हाण यांचा 57895 मतांनी विजय झाल्याचे निश्चित झाले.

या निवडणुकीत सचिन ढवळे यांना 11702, नागोराव पांचाळ यांना 8993, रमेश पोकळे यांना 6712, सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली. या मतमोजणीत एकूण 241908 मतांची मोजणी करण्यात आली. तर 23092 मते अवैध ठरली.