Vedanta foxconn project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळविल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने

Aurangabad Nationalist Congress Party youth congress wing vedanta foxconn project protest news update today
Aurangabad Nationalist Congress Party youth congress wing vedanta foxconn project protest news update today

औरंगाबाद: राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेदांता ग्रुपचा (vedanta foxconn project) वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला. राज्यातील तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र विरोधात षडयंत्र रचणा-या शिंदे – फडणवीस, मोदी सरकारच्या विरोधात आज राज्यभर निदर्शने करण्यात आले. औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवार (ता.२०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष डॉ.मयूर सोनवणे व कार्याध्यक्ष कय्युम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आले. अभिनव अशा या निदर्शनामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणेने परिसर दुमदुमले. केंद्र, राज्य सरकारने ते प्रकल्प गुजरात येथे पळविले. याविरोधात शिंदे व मोदी सरकाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात या प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. प्रकल्पाचे ठिकाण ठरायला अनेक दिवस वर्ष लागतात. यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी व इतर अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली होती. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला जाणे हे फार मोठे नुकसान आहे. त्याऐवजी मोठा प्रकल्प देतो, ही गाजर दाखवणे योग्य नाही, अशी टीका युवक युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ.मयूर सोनवणे यांनी केली आहे.

…अन्यथा आंदोलन तीव्र करु – डॉ.मयूर सोनवणे
महाराष्ट्रात या प्रकल्पामुळे १ लाख ५८ हजार कोटींची गुंतवणूक येणार होती. महाराष्ट्रातील दीड लाख युवकांना रोजगाराची संधी मिळणार होती. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे बेसिक युनिट महाराष्ट्रात आले असते, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक सवलती दिल्या. ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक देऊ केली. या प्रकल्पासाठी तत्कालीन उद्योगमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

>>गद्दारांना 50 खोके महाराष्ट्राला धोके
>>शिंदे-फडणीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात
>>मोदी शहाची चाकरी…गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी
>>गुंजता है चप्पा चप्पा महाराष्ट्र द्रोही भाजपा
>>द्या आमच्या रोजगाराची हमी बंद करा गुजरातची गुलामी 

अशा अभिनव घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मुख्तार खान, विशाल वीराळे, जुबेर खान, ऋषिकेश खैरे, विशाल हिवराळे, राम पंडित, दादासाहेब फल्ले, फैजल शहा, शाहरुख मोहम्मद, सुशील अंभोरे, मुनवर राणा, रेहमत अली, मोहमद नदीम, सौरभ मगरे, शुभम खेत्रे, गणेश अडसूळ, हेमंत देशमुख, अझहर शेख, मिलिंद जमधडे, रोहित चांचलाणी, आदित्य रगडे, आशितोष सांगोले, राहुल ढीलपे, सचिन शिंदे, अहाद इनामदार, नीरज उपासनी, मनीष डक, मंगेश गायकवाड, माऊली दौड, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here