NCP: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात ७०० जणांना विषबाधा!

aurangabad-ncp-leader-sate-vice-president-kadir-maulana-food-poisoned-at-wedding-qadir-maulana-news-update-today
aurangabad-ncp-leader-sate-vice-president-kadir-maulana-food-poisoned-at-wedding-qadir-maulana-news-update-today

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश (Vice president Ncp) उपाध्यक्ष कदीर मौलाना (kadir Maulana) यांच्या मुलाच्या लग्नात ७०० जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ७०० जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलीकडच्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ठेवली होती. मात्र यावेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली आहे.

गोड पदार्थ खाताच त्रास

राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह ४ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहात पाहुण्यांसाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

घाटी-एमजीएम रुग्णालयात भरती

कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. जवळपास ७०० नागरिकांना एकाच वेळेस घाटी रुग्णालय व एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. यामध्ये महिला, लहान मुलांचा देखील मोठचा प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here